मुंबई: बंड करून अजित पवार भाजपसोबत उपमुख्यमंत्री झाले होते. मात्र दोन दिवसातच त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाडले. राष्ट्रवादीत पुन्हा ते परतले आणि त्यांनी राष्ट्रवादीत सक्रीय सहभाग घेतला. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात सहभाग होणार की नाही? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहे. अखेर अजित पवार यांचा मंत्रिमंडळात सहभाग असणार असून ते विश्वासदर्शक ठरावानंतर होणाऱ्या विस्तारावेळी शपथ घेणार आहे. आज ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असे बोलले जात होते. मात्र मी आज शपथ घेणार नसून विस्तारावेळी शपथ घेईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे अजित पवार हे मंत्रिमंडळात असणार आहे.
राष्ट्रवादीकडून आज दोन आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. एकूण ६ आमदार आज कॅबिनेटची शपथ घेणार आहे. यात जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांचा समावेश आहे. त्यामुळे अजित पवार हे आज शपथ घेणार नाही. ३ डिसेंबरला विश्वासदर्शक ठराव घेण्यात येणार आहे, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळीच अजित पवार शपथ घेतील. आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. सायंकाळी ६.४० वाजता शिवाजी पार्क येथे त्यांचा शपथविधी होत आहे.