BREAKING: मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप !

0

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी अर्जासोबत जोडलेल्या नोटरीची मुदत संपलेली असल्याचे आरोप करण्यात आले आहे. या आरोपावरून अर्जाची तपासणी सुरु असून ४ वाजेनंतर अधिकारी याबाबत स्पष्टीकरण देणार आहे.

माजी विरोधी पक्षनेते भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर देखील आक्षेप घेण्यात आले आहे. त्यांच्या अर्जासोबतच्या नोटरीची देखील मुदत संपल्याचे आरोप आहे.