मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून त्यात त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांचे अभिनंदन केले. काल विधानसभेत महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केले. १६९ विरुद्ध ० अशा फरकाने महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केले. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच फडणवीस यांनी सभागृह दणाणून सोडले होते. त्यांचा अभिनंदनाचा ठराव विधान सभेत मांडण्यात आला त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी भाषण केले.