BREAKING: राज्याला स्थिर सरकार देणार, मी शरद पवारांसोबत; अजित पवारांचे धक्कादायक विधान

0

मुंबई: काल शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली. सोबतच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. मात्र अजित पवारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचे उघड झाले आहे. सर्व आमदार राष्ट्रवादीतच आहेत. त्यांच्याकडील गटनेते पद देखील काढून घेण्यात आले आहे. कालपासून अजित पवार कोणाशीही संपर्कात नाही. आज अजित पवारांनी प्रथमच ट्वीटकरून आपले मत व्यक्त केले आहे. पहिल्यांदा ट्वीट करताना अजित पवारांनी भाजप नेत्यांचे आभार मानले होते. आता अजित पवार यांनी ट्वीटकरून भाजप आणि राष्ट्रवादी राज्याला स्थिर सरकार देणार असल्याचे सांगत मी राष्ट्रवादीतच असून शरद पवार साहेबांसोबत आहे असे सांगितले आहे. अजित पवारांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे शरद पवार हे शिवसेनेसोबत असल्याचे सांगत असून सर्व आमदारांना एकत्र ठेवले आहे. कॉंग्रेसने देखील शिवसेनेसोबत असल्याचे सांगत भाजप बहुमत सिद्ध करणार नाही असे सांगत आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी मी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितल्याने नेमके काय सुरु आहे? याबाबत गुंता वाढला आहे.