BREAKING: अजित पवारांची मनधरणी?; प्रमुख नेते अजित पवारांच्या भेटीला !

0

मुंबई: आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही बाब संपूर्ण देशात खळबळ माजविणारी ठरली. मात्र अजित पवारांच्या या निर्णयाबाबत खुद्द पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना कल्पना नव्हती. त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांचा निर्णय अमान्य असल्याचे सांगत कारवाईचे संकेत दिले आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवारांच्या भेटीला गेले आहे. अजित पवार मुंबईत त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी थांबून आहेत, त्याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते गेले आहे.

खासदार सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या भेटीला गेले आहे. ते अजित पवारांची मनधरणीला गेले आहे. मात्र त्यांना यात यश येते का? हे आगामी काळात पुढे येईल.