BREAKING: लोकसभेतही मोठ्या फरकाने जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर !

0

नवी दिल्ली: कालपासून संपूर्ण देशात कलाम ३७० हटविण्यात आल्याचीच चर्चा आहे. कॉंग्रेसने या निर्णयाला विरोध केला आहे. काल राज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक संमत झाल्यानंतर आज लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले, त्यावर दीर्घ चर्चा झाल्यानंतर त्यावर मतदान घेण्यात आले. सुरुवातीला आवाजी मतदानाने विधेयकावर मतदान घेण्यात आले, मात्र त्याला विरोध झाल्याने यावर मतदान झाले. त्यात विधेयकाच्या बाजूने ३५१ तर विधेयकाच्या विरोधात ७२ मत पडली. राज्यसभेप्रमाणे लोकसभेतही मोठ्या फरकाने हे विधेयक पास झाले.