मुंबई: राज्यभरातील विनानुदानित शाळा, महाविद्यालयांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहे. दरम्यान सरकारने विनानुदानित शाळा, महाविद्यालयांना २० टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. ज्या शाळांना २० टक्के अनुदान आहे त्यांना ४० टक्के अनुदान देण्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका शिक्षकांनी घेतली आहे.