BREAKING: शिवसेना-कॉंग्रेस नेत्यांमध्ये दिल्लीत बैठक !

0

मुंबई: राज्यात भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून बिनसले असल्याने भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला आहे. आता शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पाठींब्यावर सरकार बनविणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांसोबत कॉंग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. दिल्लीत कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्यासोबत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई यांची बैठक होत आहे. दुपारी ४ वाजेनंतर कॉंग्रेस आपली भूमिका जाहीर करणार आहे. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर होईल असे महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले होते.