मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. भाजपनंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलविले आहे. आज दिवसभर सत्ता स्थापनेसाठी घडामोडी घडल्या. मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. दरम्यान आता शिवसेना नेते राज्यपालांच्या भेटीला गेले आहे. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीला गेले आहे. ते राज्यपालांकडून सत्तेचा दावा करतील किंवा वेळ वाढवून मागू शकतात.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शिवसेनेला पाठींबा देण्यास अनुकूल असताना कॉंग्रेस मात्र अनुकूल नसल्याचे दिसून येते. कॉंगेसचे राज्यातील नेते अनुकूल असले तरी हाय कमांड मात्र अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे.