मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून राज्यात सत्ता संघर्ष शिंगेला पोहोचले असल्याने अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. दरम्यान राज्यपालांकडून काल शनिवारी सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आले आहे. दरम्यान आज रविवारी कॉंग्रेस आमदारांची जयपूरमध्ये बैठक सुरु आहे. कॉंग्रेस आमदार जयपूरच्या एका हॉटेलमध्ये थांबून आहे, वरिष्ठ नेते आमदारांच्या भेटीला जयपूरला गेले आहेत. यावेळी शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत आमदारांमध्ये चर्चा सुरु आहे. यावेळी कॉंग्रेस आमदारांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात एकमत झाले असून शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत स्पष्ट संकेत दिसत आहे.
भाजप शिवसेनेत बिनसले असल्याचे शेवटी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत अनुकुलता दर्शवल्याचे दिसून येते.
उद्या ११ नोव्हेंबरपर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची आज रविवारी कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत भाजप सत्ता स्थापनेबाबत ठोस असा निर्णय घेऊ शकते. ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे.