BREAKING: संपूर्ण राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे, स्विमिंगपूल, जीम बंद

0

मुंबई: जगात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतातील कोरोनाची संख्या ११० च्या जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्रातही ही संख्या ३२ पर्यंत पोहोचली आहे. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरला लागू करण्यात आलेले निर्बंध आता संपूर्ण राज्याला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत नाट्यगृहे, सिनेमागृहे, जलतरण तलाव, जीम बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक पाठवून तसे आदेश दिले आहेत.