नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारकडून गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केले आहे. दोन दिवसांपासून जनता कर्फ्यू राबविण्यात येत आहे. दरम्यान आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील थांबविण्यात आले असून संसद अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. आज सोमवारी झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ एप्रिलपर्यंत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते, ते आता थांबविण्यात आले आहे.
अर्थसंकल्पाला अद्याप मंजुरी मिळणे बाकी आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे कामकाज थांबावे लागले आहे.