नवी दिल्ली: शनिवारी २३ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला समर्थन दिल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे प्रकरण संपूर्ण देशासाठी धक्कादायक होते. मात्र अजित पवारांचा हा निर्णय पक्षविरोधी असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना समर्थन नसल्याचे सांगितले. या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत भाजपला तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती. दरम्यान काल आणि आज सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखीव ठेवला असून उद्या सकाळी १०.३० वाजता याबाबत निकाल देणार आहे. त्यामुळे आज देखील भाजपला दिलासा मिळाला आहे.
सुप्रीम कोर्टात आज तिन्ही पक्ष आणि सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. कोर्टाने कुठलाही निकाल दिला नसून तो उद्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उद्याच अंतिम निकाल लागणार आहे.
आजच सकाळी महाविकास आघाडीतर्फे भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही तर सत्ता स्थापनेसाठी बोलवावे यासाठी राज्यपालांना पत्र दिले आहे. १६२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देत महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला आहे.