मुंबई: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सरकार तुम्हाला पटणार नाही, कदाचित आवडणार नाही असे काही निर्णय घेत आहे, मात्र या निर्णयाची आज आवश्यकता असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई नागपूर हे चार शहरे बंद करण्यायाची घोषणा केली. अत्यावश्यक सेवा आणि कार्यालये सुरु राहणार असून उर्वरित सर्व कार्यालये, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या कामगारांना पगार द्यावे अशी भावनिक विंनती देखील मुख्यमंत्र्यांनी खाजगी संस्था आणि व्यापारांना केले आहे.
राज्यभरातील सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली होती. मात्र २५ टक्के उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई लोकल सेवा आणि रेल्वे सेवा बंद करता येणार नाही ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितेल.
जगण्यासाठी घराबाहेर निघण्याची आवश्यकता असते मात्र आता संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरातच राहण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.