रावेर प्रतिनिधी l कृषी बाजार समिती नंतर महत्वाची मानली जाणारी रावेर पिपल्स बँकेची पंचवर्षीक निवडणुकीचा बिगुल वाजल आहे. आज पासुन उमेदवारी अर्ज विक्रीला सुरुवात होणार असुन दहा जुन’ला मतदान होणार आहे.रावेर शहरासह तालुकाभरात पिपल्स बँकेचे मतदार असुन अनेक इच्छुक येथे निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहे.
नगर पालिकेची रंगीत तालीम म्हणून रावेर पिपल्स बँकेच्या निवडणुकीकडे बघितले जाते.रावेर शहरातील अनेक दिग्गज पुढारी येथे निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहे. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी संतोष बिडवई यांनी आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.यामध्ये दि ४ मे ते दि ११ मे उमेदवारी अर्ज विक्री व स्विकारे जाणार आहे.दि १२ मे रोजी उमेदवारी अर्जाची छानणी दि १५ मे ते दि २९ मे रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असणार आहे.तर दि १० जून रोजी मतदान असणार आहे.रावेर पिपल्स बँकेला साधारण सहा हजार ९०० पर्यंत मतदार असुन येथील मतदार संपूर्ण तालुकाभर आहे.मराठा व माळी समाजासहीत इतर समाजाची मते येथे मोठ्या प्रमाणात आहेत.