मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षात बोलणी सुरु आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत आता अनुकुलता दिसून येत आहे. दरम्यान आज बुधवारी हॉटेल ट्रायडेंटमध्ये कॉंग्रेस नेते आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरु झाली आहे. राजकीय घडामोडीत कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे महाशिवआघाडीच्या दिशेने पाऊले पडत असल्याचे दिसून येते.
काल कॉंग्रेसचे केंद्रीय नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली, त्यानंतर त्यांनी भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केले. काल रात्रीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर आता कॉंग्रेस नेत्यांसोबत कॉंग्रेस नेत्यांची बैठक होत आहे.