धक्कादायक: नांदगाव स्थानकावर सुविधा एक्स्प्रेसचे चाक तुटले; मुंबईकडील वाहतूक ठप्प

0

चाळीसगाव: बरेली येथून मुंबईकडे जाणाऱ्या सुविधा एक्स्प्रेसच्या (०२०६2) इंजिनचे चाक तुटल्याची धक्कादायक घटना आज रविवारी सकाळी नांदगांव रेल्वे स्टेशन जवळ घडली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतून ठप्प झाली आहे. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

ही रेल्वे बरेलीहून मुंबईला येत होती. यावेळी नांदगाव स्थानकावर दोन डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. रेल्वेच्या चाकाला तडे गेल्याने चाक तुटले होते. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. आज रविवार असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती. रेल्वेचे चाक तुटण्याच्या घटना क्वचितच घडत असतात. या अपघातामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने प्रवाश्यांमध्ये नाराजी पसरली आहे.