घुसखोर हे ममता बॅनर्जीचे व्होटर-अमित शहा

0

कोलकाता-बांगलादेशी घुसखोर हे ममता बॅनर्जी यांची व्होटबँक आहे. त्यामुळेच त्यांचा पक्ष तृणमुल काँग्रेस एनआरसीचा विरोध करत आहे अशी घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. अमित शहा कोलकाताच्या दौऱ्यावर आहेत एनआरसीच्या मुद्द्यावरून भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

भाजपाचा आवाज जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी सरकारने बंगाली चॅनेलही बंद केले आहेत. भाजपा बंगालविरोधी असल्याच्या पोस्टरवर भाष्य करताना ते म्हणाले, भाजपा बंगलविरोधी असून शकत नाही कारण भाजपाचे संस्थापक स्वतः बंगाली होते. मात्र, आम्ही ममताविरोधी जरूर आहोत अशा शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

इंदिरा गांधींच्या काळात बोलले जायचे की, इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा. यावेळी त्यांनी कोलकाता शहरात लावलेल्या भाजपाविरोधी पोस्टर्सवरही भाष्य केले. आम्ही बंगालविरोधी नसून ममताविरोधी असल्याचे ते म्हणाले. कारण, संसदेत एनआरसीला ममता बॅनर्जी यांनी विरोध केला. मात्र, तुमच्या विरोधामुळे हे थांबणार नाही. आसाममधील एनआरसीची प्रक्रिया आम्ही न्यायिक पद्धतीने संपवू असे शाह यावेळी म्हणाले.

एक काळ होता जेव्हा बांगलादेशी घुसखोर हे कम्युनिस्ट पार्टीचे व्होटबँक होते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी लोकसभेत गोंधळ घालत बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याची मागणी केली होती. मात्र, आता हेच घुसखोर तृणमुलची व्होटबँक बनले आहेत. त्यामुळे ममताजी आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी हे स्पष्ट करावे की आपण देशाला प्राध्यान्य देता की व्होटबँकेला असे आव्हान शहा यांनी केले आहे.

आसाममधील अकॉर्ड कायदा राजीव गांधी यांनी बनवला होता. त्यावेळी काँग्रेसला कोणतीही अडचण नव्हती. मात्र, आज व्होटबँकेसाठी राहुल गांधी आपले मत स्पष्ट करीत नाहीत. त्याचबरोबर एनआरसीमुळे येथील शरणार्थींनाही जबरदस्तीने जावे लागेल असा बागुलबुवा ममता बॅनर्जी करीत आहेत. मात्र, हा शरणार्थींना परत पाठवण्याचा कार्यक्रम नाही हे मी सांगू इच्छितो. शरणार्थींना य़ेथे ठेवणे भारत सरकारची जबाबदारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.