न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ब्रेंडन मॅकलम निवृत्त !

0

मुंबईः न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सध्या मॅकलम कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये टोरोंटो नॅशनल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर तो युरो ट्वेंटी-20 स्लॅममध्ये सहभाग घेणार होता, परंतु त्याने याही स्पर्धेतून माघार घेतली आहे. मॅकलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने प्रथमच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

मॅकलमने कसोटीत 6453 आणि वन डेत 6083 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने 2015मध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. मॅकलमने त्रिनबागो नाइट रायडर्स, टोरोंटो नॅशनल्स, ससेक्स, न्यू साऊथ वेल्स आणि वार्विकशायर या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

आयपीएलमध्येही त्यानं चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आदी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानं आयपीएलच्या सलामीच्याच सामन्याला नाबाद 158 धावांची खेळी केली होती. त्याने 370 ट्वेंटी-20 सामन्यांत 9922 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 55 अर्धशतके आणि 7 शतके आहेत.