भारत वि पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय टीमला जवानांनी दिल्या जोशपूर्ण शुभेच्छा !

0

मँचेस्टर: २०१९ विश्वचषक स्पर्धेत ज्या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, तो सामना आज अखेरीस खेळवला जाणार आहे. मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण राहते, त्यामुळे या सामन्याकडे विशेष लक्ष असते. दरम्यान भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भारतीय संघाला जोशपूर्ण शुभेच्छा दिल्या. जम्मू काश्मिरात तैनात भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भारतीय संघाच्या पाठीशी असल्याचे ग्वाही देत, विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.