युवकांसाठी सुवर्णसंधी “बीएसएफ” मध्ये मेगा भरती

 

BSF Recruitment 2022 – बीएसएफ मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी धावून आली आहे कारण गृहमंत्रालय लवकरच बीएसएफ मध्ये कॉन्स्टेबलच्या 2788 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे. (BSF Bharti 2022)

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, 15 जानेवारी पासून भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत 23 फेब्रुवारी उमेदवारांना हे अर्ज भरावे लागणार आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही ITI मधील 10वी पास किंवा 1 वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम 2 वर्षांचा अनुभव किंवा ITI मध्ये 2 वर्षांचा डिप्लोमा यांसारख्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता मागवली जाऊ शकते. भरती कर अधिसूचनेमध्ये तपशीलवार माहिती उपलब्ध असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील. याच बरोबर उमेदवारांची निवड ही शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, दस्तऐवज पडताळणी, लेखी चाचणी, वैद्यकीय परीक्षा प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.

 

 

शारीरिक तंदुरुस्ती देखील महत्त्वपूर्ण बाब असणार आहे.

उंची: पुरुष = 167.5 सेमी आणि महिला = 157 सेमी

छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी

अनुसूचित जाती/जमाती/आदिवासी

उंची: पुरुष = 162.5 सेमी आणि महिला = 155 सेमी

छाती (केवळ पुरुषांसाठी): 76-81 सेमी

डोंगरी भागातील उमेदवार

उंची: पुरुष = 165 सेमी आणि महिला = 150 सेमी

छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी

 

 

बीएसएफ भरती