बीएसएनएलच्या 35 रुपयांच्या पॅकमध्ये 5 जीबी डेटा !

0

मुंबई: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच खाजगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने बीएसएनएलने 35 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ प्लानमध्ये बदल केला आहे. या प्लानमध्ये पूर्वी युजर्सना 200 एमबी डेटा मिळत होता. आता नव्या प्लाननुसार युजर्सना 5 जीबीचा डेटा मिळणार आहे. या प्लानच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आला नाही. पूर्वीप्रमाणेच प्लानची वैधता 5 दिवसांची असणार आहे.

त्याशिवाय बीएसएनएलने 53 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ वाउचरमध्येही बदल केला आहे. या प्लाननुसार, पूर्वी युजर्सना 21 दिवसांच्या वैधतेसह 250 एमबी डेटा मिळत होता. नव्या प्लाननुसार, युजर्सना 8 जीबीचा डेटा मिळणार आहे. मात्र, वैधता 21 दिवसांऐवजी 14 दिवसच असणार आहे.
बीएसएनएलच्या 395 च्या रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग (मुंबई व दिल्ली वगळता) मिळेल. त्याशिवाय युजर्सना प्रत्येक दिवशी 2 जीबी डेटा मिळेल. या प्लानची वैधता 71 दिवसांची आहे. त्याशिवाय या प्लानमध्ये युजर्सना नेट व्हॉइस कॉलवर 3 हजार मिनिटे आणि ऑफ नेट-व्हॉइस कॉल्सवर 1800 मिनिटे मिळत होती. बीएसएनएल नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.