जनशक्ती विशेष | BSNL RECRUTMENT 2021 | बी.एस.एन.एलमध्ये मेगा भारती आयोजित केली आहे. भारत संचार निगम लिमिटेड बी.एस.एन.एलने महाराष्ट्रात विविध पदांसाथी भारती राबवली आहे. अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर,नागपूर , अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती होणार आहे. या बाबतची अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे.
बीएसएनएलच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला असून, ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बीएसएनएलतर्फे एकूण ५५ जागांसाठी भरती होणार असून डिप्लोमा अप्रेंटिसची पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? इच्छुक असलेल्या उमेदवारांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. बीएसएनएलतर्फे राबवण्यात येत असलेली भरती प्रक्रिया अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर,नागपूर , अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती होणार आहे. अप्रेंटिस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. दरम्यान, पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे AICTE ने मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, ई अॅण्ड टीएस, कॉम्प्युटर, आयटी यापैकी एका ब्रांचेसमध्ये डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायदा १९६१ नुसार स्टायपेंड दिला जाईल. डिप्लोमामध्ये मिळवलेली अंतिम टक्केवारी आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.