भविष्यातील सर्व निवडणुका बसपा स्वबळावर लढणार; मायावतींची घोषणा

0

लखनौ:बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी आगामी काळातील सर्व निवडणुका बसपा स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत बसपाने उत्तर प्रदेशात सपा सोबत आघाडी केली होती. त्यात त्यांना अपेक्षित यश आले नाही. आता पुन्हा मायावती यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. समाजवादी पक्षाच्या वागणुकीमुळे भाजपला पराभूत करणे शक्य नसल्याचे आरोप मायावती यांनी केले आहे.