बुलंदशहर हिंसाचार: चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपविण्यात येणार !

0

लखनऊ : बुलंदशहरमध्ये कथित गो-हत्येच्या आरोपावरून झालेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. सध्या संपूर्ण देशात या घटनेवरून वातावरण तापले आहे. काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. या हिंसाचाराची चौकशी करण्यात आली असून अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल पोलीस महानिरीक्षक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोपविणार असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रानुसार अहवालात जिल्हा पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले आहे.