लखनऊ : बुलंदशहरमध्ये कथित गो-हत्येच्या संशयावरून झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची हत्या करण्यात आली. या घटनेवरून देशभरातील वातावरण तापले आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या सुबोध कुमार यांच्या परिवाराची भेट घेणार आहे.
सोमवारी झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांची हत्या करण्यात आली होती. याबाबत अद्यापपर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. जवळपास ८८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अद्याप अंत्यसंस्कार नाही
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जोपर्यंत कुटुंबियांची भेट घेत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पावित्रा सुबोध कुमार यांच्या कुटुंबीयांचा आहे. सुबोध कुमार यांना शहीद घोषित करावे अशी मागणी देखील होत आहे.