नंदुरबारला सुशोभिकरणांवर चालला ‘बुलडोझर’

सुशोभिकरणांमुळे प्रमुख रस्त्यांसह विविध चौफुलीवर रस्ते व्यापले

नंदुरबार प्रतिनिधी।

हरातील प्रमुख रस्त्यांसह विविध सुशोभिकरणांमुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते व्यापले जात आहे. वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत या बांधकामावर बुलडोझर चालला. त्या कामाचे आकार लहान ठेवून सुशोभिकरण तसेच ठेवण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुख्याधिकारी पुलकीत सिंह त्यांच्या कार्यकाळात आणखी नेमके कोणत्या बांधकामावर हातोडा चालवितात ? आणि शहर विकासाच्यादृष्टीने आणखी कोणते निर्णय होतात? याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागून आहे.

नंदुरबार पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी पुलकीत सिंह यांनी कार्यभार घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा घालत अतिक्रमण हटविण्याचा सपाटाच लावला असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी असलेले अतिक्रमण जेसीबी मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी हटविले आहे. दरम्यान, असे असले तरी नंदुरबार शहरातील धुळे चौफुली, करण चौफुली, नवापूर चौफुली येथे शहरवासियांसाठी आकर्षण ठरणाऱ्या चौफुलींवर सुशोभिकरण केले होते. मात्र, या सुशोभिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ता अडविला जात होता. अवजड वाहनांना वाहने नेतांना कसरत करावी लागत होती. बऱ्याचदा अपघाताची शक्यता होती. ही बाब लक्षात घेवून वाहतूक समस्या निर्माण होवू नये, यासाठी सुशोभिकरणावरील या बांधकामावर मुख्याधिकारी पुलकीत सिंह, बांधकाम अभियंता गणेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडोझर चालविण्यात आले. सुशोभिकरण तसेच ठेवून सुशोभिकरणालगत रस्ता व्यापणारे बांधकाम जमीनदोस्त केले आहे. दरम्यान, यानंतर पुन्हा दुरुस्ती करुन सुशोभिकरण तसेच राहणार आहे. चौफुलींवरील बांधकाम कमी करतांना लोकांच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेवून वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने केले आहे. दरम्यान, चौफुलींवर बांधकामावर चालत असल्याचे पाहून अनेक नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

रस्ते व्यापणारे बांधकाम निष्काषित

गेल्या काही वर्षापूर्वी नंदुरबार पालिकेच्यावतीने शहरातील चौफुलींचे गोभिकरण करत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या चौफुलीवर का पूर्णपणे उद्ध्वस्त होते की काय? अशीच मिती अनेकांकडून व्यक्त केली जात होती. नेमके सुशोभिकरणावर जेसीबी का चालविला जात आहे? याबाबत सुरुवातीला अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तसेच ठेवून ते व्यारेकम केले आहे.