रावेर शहरात घरफोडी;नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

रावेर प्रतिनिधी l रावेर शहरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तेरा हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना रात्री घडली आहे.यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल आहे.

या बाबत वृत्त असे की रावेर शहरातील रामचंद्र नगर मध्ये रहीवासी असलेला गिरीष शरद पाटील हे शनिवारी आपल्या परिवारासह भुसावळ येथे परगावीगेले होते. ही संधी साधुन अज्ञात चोरट्याने दि २ जून ते ४ जुन च्या दरम्यान घराचा पुढील लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला.घरातील कपाटात ठेवलेले सात हजार रुपये एलजी कंपनीचा टीवी,स्मार्ट वॉच,असा एकूण साडे तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे.या बाबत गिरीष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरुध्द भादवी ३८०,४५४,४५७ प्रमाणे गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस कॉस्टेंबल अतुल तडवी करीत आहे.