महामार्गावर बर्निंग ट्रक

0

महामार्ग 6 देतोय मृत्यूला आमंत्रण

चौपदरीकरणाचे काम अपूर्णावस्थेतच

नवापूर : तालुक्यातील महामार्ग क्रमांक 6 वर ट्रकला अचानक आग लागून तो जागीच खाक झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. मात्र, ही आग कशी लागली त्याची माहिती मिळू शकली नाही. यामुळे राष्ट्रीय महामार्ग 6 मृत्यूला आमंत्रण देणारा ठरत असल्याचे चित्र सद्यस्थितीला दिसत आहे. त्यातच चौपदरीकरणाचे काम बंद पडल्याने ते अपूर्णावस्थेत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

महामार्गावर रोज हजारो वाहने ये-जो करतात. या महार्गावर अनेक राज्यातील वाहने जातात. त्यात बहुतांश कंपनीचे टँकरसह अनेक चाकांची महाकाय वाहने ये-जा करतात. यामुळे रस्त्यांची अवस्था दयनिय होऊन खड्डे पडले आहेत. अनेकवेळा ट्रका पलटी होऊन अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी चिंचपाडा रेल्वेगेटजवळ एक ट्रक पलटी होऊन आग लागून भस्म झाला होता. त्या ट्रकचा सांगाडा अजुनही तेथे पडून आहे. तोच ट्रक पलटी होऊन महामार्गावर वाहने ठप्प होऊन एकच धांदल उडाली होती. तसेच दुतर्फा वाहने ठप्प होऊन महामार्ग बंद झाला होता.

नवापूर, नंदुरबार आणि इतर भागातून अग्निशामक मागवून आग विझविण्यात आली. तोपर्यंत ट्रक पूर्ण भस्म झालेला होता. ओव्हरलोड वाहने या मार्गावर येऊन खड्ड्यात जाऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्ग मोठ्या वाहनांसाठी योग्य राहिलेला नाही. या मार्गावरील बंद पडलेले काम केव्हा सुरु होईल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. केमिकलने भरलेले अनेक ट्रक पलटी होऊन धोकेदायक प्रसंग घडलेले आहे. बर्निंग ट्रकच्या प्रकारातही वाढ झाल्याचे चित्र आहे.