गडचिरोलीत बस-ट्रकच्या अपघातात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

0

गुरुपल्ली-गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ आज बुधवारी सकाळी ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. यात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ९ जण गंभीर जखमी झाले आहे.

एटापल्लीपासून पाच किमी अंतरावरील गुरुपल्ली गावाजवळ अहेरी डेपोच्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुराडा झाला. सकाळच्या वेळेस निघालेल्या या बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मृतांमधील सहा जण हे विद्यार्थी असल्याचे समजते. जखमींना एटापल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ट्रकने बसला धडक दिली तो ट्रक एका खाणकंपनीचा होता. या अपघातानंतर संतप्त जमावाने या मार्गावरील दोन ते तीन ट्रक पेटवून दिले आहे.