उद्योजक नितीन संदेसरा यांना फरार घोषित करा-ईडी

0

नवी दिल्ली : देशातील बँकांना ५ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेले उद्योजक नितीन संदेसरा आणि त्याच्या अन्य साथीदारांना फरार घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे.

संदेसराने आंध्र बँकेचे 5 हजार कोटी रुपय थकविले आहे. यामुळे त्याचे नातेवाईक चेतन संदेसरा, दिप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना फरारी घोषित करण्यात यावे, या चौघांनीही चौकशी टाळण्यासाठी परदेशात पलायन केल्याचा आरोप इडीने ठेवला आहे.