61 लाख खर्चून वरणगावात बुद्ध विहाराची उभारणी

0
वरणगाव- शहरातील वामन गुरुजी नगरात 61 लाख रुपये खर्चून बुद्ध विहाराची उभारणी केली जात आहे. याबाबत मागणी नगरसेविका माला मिलिंद मेढे व कामगार नेते मिलिंद मेढे यांनी नगराध्यक्षांकडे केली होती. कामाचे भूमिपूजन नुकतेच नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
नगराध्यक्ष सुनील काळे हे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे नगराध्यक्ष असून त्यांनी आपण मागणी करताच 61 लक्ष रुपये तत्काळ बुद्ध विहारासाठी मंजूर केले याचा मला अभिमान आहे.  बुद्ध विहार उभे राहिल्याने शहरातील समाज बांधवांसाठी एक प्रकारची अभिमानाची बाब असून जिथे-जिथे मागासवर्गीय बांधव राहत असतील तिथे दलित वस्ती योजनेतून कामेदेखील नगराध्यक्ष करताील, असा आशावाद कामगार नेते मिलिंद मेढे यांनी व्यक्त केला.
वरणगावच्या विकासासाठी कटीबद्ध  
नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की,  वरणगाव शहराच्या विकासासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही. वेळप्रसंगी जीव जरी गेला तरी परवा नाही. विकासाचा हा रथ सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याने हाकण्यासाठी अथक परीश्रम घेणार आहे. किती ही मोर्चे आणले  तरी घाबरणार नाही. विकासाच्या बाबतीत तहानलेल्या  वरणगावचा विकास हेच ध्येय संकल्प आहे त्यासाठी जोरदार प्रयत्न करू. पाच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून सात कोटी 51 लाख रुपये वरणगावच्या विकासासाठी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी नगरसेविका माला मेढे, कामगार नेते मिलिंद मेढे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी सरपंच सुखलाल धनगर, माजी उपसरपंच साजीद कुरेशी, समाजसेवक इरफान पिंजारी, भाजपाचे कार्यकर्ते शामराव धनगर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य झानेश्वर घाटोळे, छगन सुरवाडे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.