नागपूर: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा लागू केला आहे. या कायद्याला देशभरात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. महाराष्ट्रातील सरकारने देखील याला विरोध केला आहे. दरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले आहे. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हे विधेयक बेकायदेशीर आहे असे आरोप केले. अशोक चव्हाण यांच्या ‘कायदा संविधान विरोधी आहे’ या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेत सभागृहात गदारोळ केला. शेवटी सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.
केंद्र सरकारने केलेल्या कायद्यावर विधिमंडळात बोलण्याचे अधिकार कोणालाही नाही, याबाबत फक्त सुप्रीम कोर्टच विधान करू शकते असे म्हणत विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतले. अशोक चव्हाण यांनी संपूर्ण देशात या विधेयकाला विरोध होत असल्याने आम्ही देखील विरोध दर्शवितो आहे. विरोध करण्याचे आम्हाला अधिकार आहे असे प्रत्युत्तर दिले.