मंत्रिमंडळ बदलाचा कथुआ घटनेशी संबंध नाही

0

श्रीनगर-जमू काश्मीर राज्यातील कथुआ येतील घटनेमुळे सरकारच्या मंत्रिमंडळात फेर बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याने मंत्रिमंडळात फेर बदल करण्यात आले असून कथुआ बलात्कार घटनेचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नसल्याचे भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले आहे. नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. मंत्रिमंडळ फेरबदलात भाजपचे पाच आमदार शपथ घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी कविंदर गुप्ता हे आता उपमुख्यमंत्री असतील.

यांनी घेतली शपथ
भाजपा कथुआ आमदार राजीव जसोरोटिया आणि पीडीपी पुलवामाचे आमदार मोहम्मद खलील बंध यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारमधील मंत्री म्हणून शपथ घेतली.