नवी दिल्ली: देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी होत होती. यावरून आज केंद्रीय कॅबिनेटने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या मुख्य न्यायाधीश वगळता ३० वरून ३३ करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्य स्थितीत सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि इतर ३० असे एकूण ३१ न्यायाधीश आहेत.