19 जूनपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार? नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई l गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी अनेक इच्छूक आमदार देव पाण्यात घालून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे या मंत्रिमंडळात महिलांना देखील स्थान मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखावर तारखा समोर येत आहेत. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, शिवसेनेच्या वर्धापन दिना आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत मांडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे.