शिंदखेडा तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस पद भरती साठी अर्ज करण्याचे आवाहन – बालविकास प्रकल्प अधिकारी एन.टी.पावरा

शिंदखेडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यात एकुण 75 अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया 6 जुलै पर्यंत अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सह तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी एन. टी.पावरा यानी कळविले आहे. सविस्तर माहिती अशी की, धुळे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिंदखेडा क्र. 1 व 2 अंतर्गत एकुण 75 अंगणवाडी मदतनीस रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांनी सहा जुलै पर्यंत विविध नमुन्यात अर्ज मागवले आहे. शिंदखेडा तालुक्यातील प्रकल्प 1 चे रिक्त पदे अशी आहे – नेवाडे , लोहगाव , रंजाणे , चिलाणे , विरदेल , वरपाडा , नरडाणा , धांदरणे , डाबली ,विटाई , दभाशी , कमखेडा , वडली , हंबर्डे , वर्षी , निरगुडी , वरसुस , दत्ताणे , अजंदे खु. डोंगर गाव , पिंपरखेळा , कंचनपुर , गोराणे , वाघोदे , माळीच , वालखेडा , वाघाडी बु. , बेटावद , अजंदे , भिलाणे दिगर , मुडावद , पाष्टे , म्हळसर , भिलाणे , पिंपाळ , याप्रमाणे अंगणवाडी तील चाळीस पदे रिक्त आहेत. तर प्रकल्प दोन चे निमगुळ 2-5 , दाऊळ , 1-2-3 , मंदाणे 1 , बाम्हणे 1-2-3 , जुने कोळदे , मालपुर , 1-4 , सुराय , सतारे 1 , कर्लै 2-4 , डागुर्णै 1 , चिरणे , कदाणे 1-2, बाभुळदे , साहुरृ, महाळपुर , निशाणे , सोंडले , सवाईमुकटी 2 , चिमठावळ , अमराळे 2 , रोहाणे 2 , विखरण 1,2,5 , रहिमपुरे 1, मेथी , कुरुकवाडे , अमळथे येथील अंगणवाडी तील 35 पदे रिक्त आहे. तरी सदरील अंगणवाडी मदतनीस भरती पदासाठी पात्र उमेदवारांनी सहा जुलै पर्यंत अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सह बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला. टी.पावरा यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.