लखनौ: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला संघाच्या तिसरा एकदिवसीय सामना आज शुक्रवारी सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले आहेत. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघासाठी आजचा दिवस खास ठरला आहे. कर्णधार मिताली राज हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आणखी एक पराक्रम आणि विक्रमी कामगिरी केली आहे. मिताली राज ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारी भारताची पहिली महिली क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या सामन्यात ३६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. या यशासाठी बीसीसीआयने मितालीचे अभिनंदन केले आहे.
India's ODI cricket captain Mithali Raj becomes first Indian batswoman to score 10,000 international runs: BCCI
(File photo) pic.twitter.com/HGeJrmUthj
— ANI (@ANI) March 12, 2021
मिताली राज हिने १० कसोटी, २११ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांसह मितालीने ८ शतके आणि ७५ अर्धशतके फटकावली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिची सरासरी ही ५० हून अधिकची आहे.