सीबीआय प्रकरणाची चौकशी न्यायालयामार्फत व्हावी; सुप्रीम कोर्टात याचिका

0

नवी दिल्ली-सीबीआयच्या प्रकरणाने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. केंद्राने यात हस्तक्षेप करत सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी न्यायालयामार्फत व्हावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज या एनजीओने याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने विचार करून निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे. सीबीआयचे नवीन प्रभारी संचालक म्हणून निवड करण्यात आलेल्या नागेश्वर राव यांच्या निवडीचे देखील न्यायालयामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.