नवी दिल्ली-देशाच्या सर्वात मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयमधील विवादाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालय अलोक वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. दरम्यान या वादात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर सीबीआयच्या कामगिरीत हस्तक्षेप करण्याचे आरोप होत आहे.
विशेष संचालक राकेश अस्थाना यांची चौकशी करणारे सीबीआयच्या डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी अजित डोवाल आणि केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरी यांच्यावर हस्तक्षेप करत असल्याचे आरोप केले आहे.
केंद्रीय कोळसा मंत्री हरिभाई चौधरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मंत्री चौधरी यांनी या प्रकरणात माझा सहभाग नाही, जर आढळला तर मी राजीनामा देईल असे सांगितले आहे. सीबीआयच्या डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांना सर्वोच्च न्यायालयाने आज उपस्थित राहण्यास सांगितले आहे.