सीबीआय प्रभारी संचालकपदी एम.नागेश्वर राव !

0

नवी दिल्ली- सीबीआयमधील उच्चपदस्थांमध्ये सध्या संघर्ष पाहायला मिळत आहे. अखेर केंद्र सरकारने मध्यस्थी करत दखल घेतली आहे. केंद्र सरकारने सीबीआय प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआय प्रभारी संचालकपद सोपवण्यात आले आहे. 1986 च्या बॅचमधील ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी राव तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

केंद्र सरकारने यासंबंधी आदेश जारी करत तात्काळ स्वरुपात आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांची नियुक्ती केली आहे. महत्त्वाचं म्हणजे विशेष संचालक अस्थाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफआयआरमध्ये मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याडून तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली.