ऋषी कुमार शुक्ला सीबीआय संचालकपदी रुजू !

0

नवी दिल्ली-सीबीआय संचालकपदाचा तिढा अखेर सुटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती केली आहे. शुक्ला यांनी आज पदभार स्वीकारला आहे. शुक्ला १९८४ बॅचचे अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे माजी डीजीपी आहेत.

शुक्ला यांची दोन वर्षांसाठी सीबीआय संचालकपदावर निवड झाली असून संस्थेची विश्वासहर्ता पुन्हा निर्माण करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन अधिकाऱ्यांच्या वादात सीबीआयच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ऋषी कुमार शुक्ला यांचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच सीबीआय विरुद्ध कोलकाता पोलीस असा वाद पेटला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर हे मोठे आव्हान आहे.