नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालकपदी आलोक वर्मा यांना केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यांना सक्तीच्या रजेवर ही चुकीचे ठरवीत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची रजा रद्द केली. आलोक वर्मा यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर आज पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
सह संचालक अजय भटनागर, डीआयजी एम के सिन्हा, तरुण गौबा, मुरमगेसन आणि अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच अनिश प्रसाद हे सीबीआय मुख्यालयाच्या प्रशासन विभागाचे उपसंचालक पदीच कायम राहणार आहे. तर के आर चौरासिया हे विशेष युनिट क्र.१ च्या प्रमुखपदी राहणार आहेत.