दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या २०१७-१८ वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत.
यंदा सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात एक टक्क्याने वाढ झाली आहे. मागच्या वर्षीचा निकाल ८२.०२ टक्के होता. मार्च-एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून एकूण ११, ८६, २०६ विद्यार्थी बसले होते. ४, १३८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. पेपर लीकमुळे ही परीक्षा वादात सापडली होती.
पेपर लीकमुळे वाद
खरंतर सीबीएसई बारावीची परीक्षा १३ एप्रिल रोजी संपणार होती. शेवटचा पेपर फिजिकल एज्युकेशन विषयाचा होता. पण देशातील अनेक ठिकाणी पेपर लीक झाल्याने अर्थशास्त्राचा पेपर रद्द करण्यात आला होता. २५ एप्रिल रोजी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्यात आला होता.