सीबीएसई परीक्षेत स्मृती इराणींच्या मुलाला ९४ तर केजारीवालांच्या मुलाला ९६ टक्के

0

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ने आज १२ वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर केला. यात केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचा मुलगा जोहर उत्तीर्ण झाला आहे. जोहर ९४ टक्के गुण मिळले आहे. मुलगा पास झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी आपला आनंद ट्विटरवर व्यक्त केला आहे.

स्मृती इराणी यांनी ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. माझा मुलगा चांगले गुण घेऊन बारावीची परीक्षा पास झाल्याचा आनंद होत आहे. जोहरवर मला गर्व आहे. प्रमुख चार विषयांमध्ये त्याला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. अर्थशास्त्रमध्ये ९४ गुण घेतल्याचा जास्त आनंद होतो आहे, त्याचा मला जास्त आनंद होतो आहे, मला माफ करा पण आज मी फक्त आई आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित केजरीवालनेही ९६.४ टक्के गुण मिळवले आहे. केजरीवाल यांची पत्नी सुचिता केजरीवाल यांनी ट्विट करत ही माहिती दिली.