मुंबई: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)च्या विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का देत १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुलीच अव्वल स्थानी आहे. यावर्षी ४९९ गुण मिळवत दोन विद्यार्थिनी देशात पहिल्या आल्या आहेत. डीपीएस गाजीयाबादची विद्यार्थिनी हंसिका शुक्ला आणि मुजफ्फरनगरमधील एसडी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी करिष्मा अरोरा या दोघींनी ४९९ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर हरियाणाची भाव्या, ऋषिकेशमधील गौरंगी चावला आणि रायबरेलीतील ऐश्वर्या या तीन मुलींचा समावेश आहे. सीबीएसई परीक्षेचा निकाल ८३.4 टक्के लागला आहे.