सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर !

0

मुंबई:सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)च्या विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का देत १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विभागांचे निकाल एकाचवेळी प्रसिद्ध करण्यात आलेआहेत. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे

या वेळी सीबीएसईचे निकाल १० मेपर्यंत प्रसिद्ध केले जातील असे बोलले जात होते. गेल्या वर्षी इयत्ता १० वीचे निकाल २६ मे, तर १२ वीचे निकाल २९ मे या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले होते. या वेळी मात्र निवडणुकीमुळे सीबीएसईच्या परीक्षा लवकर आटोपण्यात आल्या होत्या. पेपर तपासणीचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आले होते. या वेळी सीबीएसईने १ कोटी ७० लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे काम केले आहे. या उत्तरपत्रिका एकूण ३ हजार तपासणी केंद्रांवर तपासल्या गेल्या. एक शिक्षक दिवसाला जवळजवळ २५ उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण करतो. या वेळी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.