मोदी म्हणतात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ परंतू कसे?; बलात्कार पीडितेच्या आईचा प्रश्न

0

चंदीगढ- हरियाणामध्ये सीबीएसई टॉपर असलेली आणि राष्ट्रपतींकडून सन्मानित करण्यात आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रेवाडी येथे ही घटना घडली आहे. पीडित तरुणीच्या आईने आरोप केला आहे की, मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’….परंतू कसे ? असा संतप्त सवाल तरुणीच्या आईने विचारला आहे. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे’, अशी मागणी पीडित तरुणीच्या आईने केली आहे. सोबतच पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.