निगडी । समता भ्रातृ मंडळ तसेच जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिन, स्नेह मेळावा, कामगार दिन, महाराष्ट्र दिन समाज बांधवांचा सत्कार समारंभ असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. मंगळवारी दुपारी 3 वाजता हरिपाठ उपासना, वामनराव पै, सद्गुरु सतसंग चंद्रकांत लोखंडे, यांनी तसेच त्यांचे सहकारी यांनी भक्तीमय वातावरणात सादर केला. त्यामुळे मंडपातील वातावरण भक्तीमय, संगीतमय झाले होते. त्यानंतर 4 वाजेपासून समाज बांधव व भगिनींसाठी संगीत खुर्ची तसेच ‘सलाम नमस्ते’ असे कार्यक्रम घेण्यात आले.
लहानग्यांसाठी कॅरम, बुद्धिबळ, रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धकांमधून विजेते घोषित करण्यात आले. या सर्व विजेत्यांना मंडळाकडून पारितोषिक देण्यात आले. यावेळी समाजबांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.
यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन
या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष भानुदास इंगळे, उपाध्यक्ष रघुनाथ फेगडे, घनश्याम जावळे, सचिव चुडामण नारखेडे, सहसचिव किरण चौधरी, खजिनदार सिताराम राणे, सहखजिनदार रमेश इंगळे, मंडळाचे सदस्य मधुकर पाचपांडे, अप्पा खाचणे, निनाद वायकोळे, रेखा भोळे, विभावरी इंगळे, सुलभा धांडे, जितेंद्र होले, डिगंबर महाजन, नरेंद्र पाटील, सुरेश फेगडे, धीरज नारखेडे, निखील राणे, गिरीश पाटील, जयंत चौधरी, सचिन चौधरी आदींनी केले.
विविध स्पर्धेच्या विविध फेर्या…
महिला गट संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये विभावरी इंगळे, रचना बर्हाटे या महिलांना विजेतेपद मिळाले. तर पुरुष गटात रवींद्र बर्हाटे, रितेश चौधरी हे विजेते ठरले. कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत चि. पराग नेमा महाजन, चि. हितेश अनिल चौधरी, दुसर्या फेरीत आदिती यशवंत वाघुळदे, तिसर्या फेरीत पालक जितेंद्र महाजन तसेच बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीत चि. हेरंब चंद्रकांत चिरमाडे, दुसर्या फेरीत सुयोग सुरेश फेगडे, तिसर्या फेरीत आदिती यशवंत वाघुळदे, चौथ्या फेरीत, श्रेया नरेंद्र पाटील या बालगोपालांनासुद्धा चॉकलेट, पेन, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच महिलांसाठी उखाणे तसेच इतर स्पर्धात्मक खेळ घेऊन पैठणीचे वाटप करण्यात आले. यामध्ये रचना बर्हाटे, विभावरी इंगळे, प्रतिभा भंगाळे, विजेत्या ठरल्या. टिना किरण चौधरी या चिमुकलीने उत्कृष्ट नृत्य सादर केल्याबद्दल तिलाही सन्मानित करण्यात आले.
मंडळाच्या वार्षिक ताळेबंदाचे वाचन…
पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गणेशपूजन,आरती करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र लेवा महासंघाचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, भ्रातृ मंडळ पुणे अध्यक्ष रविंद्र चौधरी, समता भ्रातृ मंडळ अध्यक्ष रविंंद्र बर्हाटे, समता भ्रातृ मंडळ संस्थापक भागवत चौैधरी हे अतिथी उपस्थित होते. मंडळातर्फे पाहुण्यांचे स्वागत, सत्कार, करण्यात आले. आण्णासाहेब पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. पाटील यांच्या समक्ष उपस्थित असलेल्या समाजबांधवांसमवेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेमध्ये गेल्यावर्षाचा ताळेबंध वाचून पुढील वर्षाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. मंडळाचे सचिव चुडामन नारखेडे यांनी प्रास्ताविक सादर केले. या प्रास्ताविकामध्ये समाजबांधवांना देणग्या, जाहिराती देऊन निगडी येथील जागेच्या विकासासाठी मंडळाची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मंडळाचे खजिनदार सिताराम राणे यांनी मंडळाचा जमा-खर्च वाचून दाखविला.
महाराष्ट्र व कामगार दिन या निमित्त सर्व कामकारांना शुभेच्छा देण्यात आल्या. 2018 चे डिजिटल ‘वर्षपुष्प’चे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. भव्य-दिव्य असा देशव्यापी वधू-वर मेळावा 2018 च्या अर्जाचे उद्घाटन करण्यात आले. या वधू-वर मेळाव्याचे ऑनलाईन अर्ज भरणे. 1 जून 2018 पासून होणार आहे. हा वधू-वर मेळावा सुद्धा डिजिटल राहणार आहे. यानंतर लकी ड्रॉ या स्पर्धेचे आयोजन रेखा भोळे व विभावरी इंगळे यांनी केले. या लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आल्या. यामध्ये रिता जावळे, शितल नारखेडे, लिना चोपडे, सौ. गाजरे या विजेत्या ठरल्या.
ज्येष नागरिकांचा सत्कार…
ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कारामध्ये सुधाकर लिलाधर महाजन यांच्या वयाच्या 75 व्या वर्षी सत्कार घेण्यात आला. कामगार दिनानिमित्त गुणवंत कामगार रितेश चौधरी यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे वारकरी सतत 5 वर्षे पंढरपूरला पायी वारी करणारे समाजबांधव, यामध्ये तुषार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक नामदेव ढाके यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंडळाचे कार्यकारिणी सदस्य नरेंद्र लालजी पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
पाहुण्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात प्रमोद महाजन यांनी लेवा समाजाविषयी बहुमोलाचे मार्गदर्शन केले. कार्यकारिणी मंडळाला शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी समाजबांधवांच्या लक्षणिय उपस्थितीमुळे आनंद झाल्याचे मत व्यक्त केले. मंडळाचे अध्यक्ष रविंद्र बर्हाटे यांनी समाज व कार्यरत मंडळे याविषयी माहिती दिली.
स्नेहभोजनाचा समाजबांधव तसेच भगिनींनी आस्वाद घेतला. स्वरसंगम कार्यक्रम पूनम चौधरी व त्यांचे सहकारी यांनी मधूर आवाजात वातावरण संगीतमय केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत बारी व हर्षा जंगले यांनी केले.