श्री.संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

शहादा :- येथे श्री. संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायातील व संत परंपरेतील एक अग्रज सुधारक , मानव जातीचे कल्याणाचे पुरस्कर्ते व सुधारक असलेले संतशिरोमणी श्री. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांची प्रतिमापूजन , अभिषेक , समाज प्रबोधनपर व्याख्यान , भजन – कीर्तन , महाप्रसाद वितरण आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री. संत सेना चौक या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरालाल बोरदेकर , शहादा शहर भाजपचे शहराध्यक्ष विनोद जैन , नाभिक समाज पंच मंडळाचे कोषाध्यक्ष लाला कन्हैया , तुंबा पटेल , माजी सचिव परमेश्वर चव्हाण , रमण सोनवणे , गणेश जाधव , जगन्नाथ जांभळे , संजय जांभळे , प्रा. डॉ. अनिल साळुंके, हेमराज पवार , दत्तात्रय अमळथेकर , दिलीप कन्हैया , लक्ष्मण पटेल , काशिनाथ जाधव , ताराचंद पटेल , सुभाष अमळथेकर , निलेश जांभळे , भिका अमळथेकर , प्रकाश जांभळे , अनिल जांभळे, अंबालाल बोरदेकर , यशवंत बोरदेकर आदी नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री.संत सेना महाराज व कुलस्वामिनी लिंबच माता यांच्या प्रतिमेच्या पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. डॉ. अनिल साळुंके यांनी , वारकरी संत परंपरेतील श्री संत सेना महाराज हे एक प्रमुख समाज प्रबोधन करणारे सुधारक संत असून त्यांनी सामाजिक विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या जीवन व कार्यातून प्रेरणा दिली. अंधश्रद्धेच्या नादी न लागता श्रध्दा ठेऊन विज्ञानवादी झाले पाहिजे , मानवाचे कल्याण व अंजली गांजले दीनदुखी मनुष्याची सेवा हीच खरी परमेश्वर सेवा आहे अशी शिकवण दिली असून त्याचे प्रत्येकाने जीवनात आचरण केले पाहिजे , असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण पटेल ,सूत्रसंचालन राहुल अमळथेकर व आभार योगेश सोलंकी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संत सेना नवरात्र उत्सव मंडळ श्री. संत सेना चौक येथील कार्यकर्ते यांनी अधिक परिश्रम घेतले.